


जगातील सर्वात मोठे मंदिर... जगातील आठवे आश्चर्य... यूनेस्को प्रमाणित वर्ल्ड हेरिटेज साईट
अंगकोरवाट विष्णूधाम कंबोडिया
Grow Your Vision
Welcome visitors to your site with a short, engaging introduction.
Double click to edit and add your own text.
अंगकोरवाट विष्णुधाम:
जगातील सर्वात मोठे मंदिर श्री विष्णू मंदिर उपासनेचे ठिकाण श्री विष्णू मंदिर : अंगकोरवाट मंदिर हे युनेस्कोने जाहिर केलेले जागतिक वारसा स्थळ असून, ख्मेर साम्राज्याचे अलौकिक रत्न आणि जगातील सर्व धर्मांतील सर्वात मोठे धार्मिक स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. 'भव्य आणि विशाल' हे शब्द संकल्पना, रचना आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अपुरे आहेत, हे इतके अप्रतिम आणि विलक्षण मंदिर आहे. हे मंदिर ख्मेर राजा सूर्यवर्मन दुसरा ( इ. स. 1113-1150 AD ) याने बांधले होते. मंदिराच्या सभोवती आजूबाजूला मोठे खंदक असून त्यावर दगडी पूल बांधलेले आहेत. हे मंदिर 510 एकर परिसरात बांधले आहे. मंदिराच्या वाटेवर प्रत्येक थांब्यावर तटबंदी आहेत. येथील आठ भुजा असलेली विष्णू मूर्ती सुमारे 15 फूट उंच आहे. मंदिराच्या आतील भिंती दगडी भित्तीचित्रांनी मढवलेल्या आहेत. या तटबंदीने संपूर्ण मंदिर व्यापले आहे. ही तटबंदी एकमेकांच्या वरती आहेत. त्याची रचना एका पिरॅमिडसारखी आहे ज्यामध्ये 5 शिखरे आकाशात उंच आहेत. मुख्य मंदिर 220 फूट उंच आहे. या मंदिरात 10 फूट उंच आणि 300 फूट लांबीच्या 8 मूर्ती आहेत. जेव्हा हे मंदिर पूर्ण झाले आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लोक वसती करून राहू लागले तेव्हा लंडनची लोकसंख्या ३,००० होती आणि अंगकोरवाटची लोकसंख्या १०,००,००० होती...

अंगकोरवाट विष्णुधाम प्रेक्षणीय स्थळे

अंगकोरवाट विष्णुधाम

अंगकोर थॉम और बयोन

सहस्र लिंग दर्शन कबाल स्पियन

टोनले सॅप (फ्लोटिंग विलेज) नो मैन्स लैंड

अप्सरा नृत्य प्रदर्शन

बांटी श्री अर्थात त्रिभुवन महेश्वर मंदिर

ता प्रोम और प्री खा वृक्ष मंदिर
